Thergaon : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यावसायिकांवर कारवाई
साडेपाच हजाराचा दंड वसूल
एमपीसी न्यूज – थेरगाव येथे आज जायका चहा या दुकानावर पार्सलसाठी वापरल्या जाणाऱ्या २.५०० किलोग्रॅम प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करून रु ५००० चा दंड करण्यात आला. 16 नंबर बी आर टी येथे कचरा टाकणाऱ्या २ व्यक्ती वर ३६० रु दंड करण्यात आला व एका व्यक्ती वर अस्वच्छतेबाबत २०० रु दंड आकारण्यात आला, असे एकूण ५ हजार ५६० रूपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई ग प्रभाग सहाय्यक आयुक्त तथा क्षत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांच्या नेतृत्वाखाली व सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक आर .एम .बेद व आरोग्य निरीक्षक एस बी चन्नाल व कर्मचारी अभय दारोळे, अरुण राऊत व प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.