Pimpri : सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका; नदीकाठी असणा-या नागरिकांनी सतर्क रहावे 

महापौर, आयुक्तांनी केले आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रात सतत पडणा-या पावसामुळे वाढ होत आहे. नदीकाठी असणा-या नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच नदीच्या पात्राजवळ व पुलाच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न नागरिकांनी करून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना, मुळा व इंद्रायणी नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. येत्या काळात आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठी असणा-या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत व सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पूरनियंत्रण कक्ष कार्यरत आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.