Sangvi : उन्नती महिला गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी ‘ती’चा गणपती उत्सव साजरा करण्य्यात येतो. या महोत्सवामध्ये दररोज समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या हस्ते गणरायाची आरती आणि पूजा करण्यात आली. मंडळाची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली.

शिक्षक, बँक, वकील, डॉक्टर, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, बचत गटातील महिला यांच्या हस्ते आरती आणि पूजा घेण्यात आली. मंडळाच्या वतीने महापूर येण्याची कारणे तसेच उपाय हा देखावा करण्यात आला होता. या महोत्सवाची विसर्जन मिरवणूक शिवाज्ञा ढोल पथक यांच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात व पालखी सोहळ्याने काढण्यात आली.

यावेळी उन्नती महिला गणेशोत्सव मंडळाच्या सर्व महिला सदस्य, उन्नती सोशल फौंडेशनच्या महिला सभासद, जेष्ठ नागरिक, आनंद हास्य योगा क्लब महिला सभासद, बचत गट, नवचैतन्य हास्य क्लब सदस्य, विठाई वाचनायलायच्या महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उन्नती सोशल फाऊंडेशन व उन्नती महिला गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी सर्व गणेश मंडळांना ‘गणरायाची मिरवणूक ही पारंपरिक व पर्यावरणपूरक काढण्यात यावी’ असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.