Talegaon Dabhade : सांगुर्डी येथील ह.भ.प.ज्ञानोबा भसे यांचे निधन
एमपीसी न्यूज – सांगुर्डी (ता.खेड) येथील केंद्रीय संरक्षण खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी ह.भ.प.ज्ञानोबा महादू भसे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 91 वर्षाचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, तीन मुले, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
ह.भ.प.ज्ञानोबा भसे हे माजी प्राचार्य आणि पत्रकार बबनराव भसे यांचे मोठे बंधू होत. प्राचार्य सूर्यकांत भसे तर, ह.भ.प.चंद्रकांत भसे व ग्रा.पं.सदस्य दिनकर भसे यांचे ते वडील होत. तसेच डाॅ.सचिन भसे यांचे चुलते होत.