Pimpri : एनसीईआरमध्ये युवा प्राध्यापक प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे युवा प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली आहे. याप्रसंगी भुवनेश कुलकर्णी यांनी अभियांत्रिकीच्या युवा प्राध्यापकांसमोर असलेल्या आव्हानांचा आढावा घेतला आणि त्यातून मार्ग काढण्याचे अनुभव कथन केले आहे.

या प्रसंगी डॉ. हेमंत अभ्यंकर, भुवनेश कुलकर्णी, डॉ. एस. बी देवसरकर यांनी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. संस्थेचे विश्वस्त, महाविद्यालयाचे चेअरमन राजेश म्हस्के, डॉ. ललितकुमार वधवा याप्रसंगी उपस्थित होते.

‘अभियांत्रिकीचा शिक्षक कसा असावा’ या विषयावर उद्बोधन करताना डॉ. अभ्यंकर म्हणाले, “विद्यार्थी घडविण्याचे उदात्त काम प्राध्यापक करत असतात. अखंडपणे शिकत राहणे, वाचन करणे, व्यक्तिमत्त्व प्रगल्भ बनविणे आदी कृती शिक्षकांना काळानुरूप सुयोग्य बनवत राहतील.” ‘प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थी अधिक शिकत राहतील, याची  काळजी अभियांत्रिकीच्या
प्राध्यापकांनी घ्यावी,’असेही पुढे बोलताना ते म्हणाले.

डॉ. देवसरकर यांनी प्राध्यापकांना उपलब्ध असलेल्या स्वविकसनाच्या संधींची माहिती दिली. डॉ. बाटु विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या प्राध्यापक विकास योजनांचा विस्तृत आढावा घेतला. कार्यशाळेचे आयोजन प्रा. अपर्णा पांडे, प्रा. भीमराव गायकवाड, प्रा. मिलिंद ओव्हाळ, प्रा. नीरज मोहिते, प्रा. विशाल बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा शिनगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विशाल बिराजदार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.