Pimpri : वंचित बहुजन आघाडीतर्फे उद्या शहर बंदची हाक

एमपीसी न्यूज – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने उद्या (शुक्रवारी) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील बंद पाळण्यात येणार असल्याचे, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सांगितले.

जनतेचा सरकारविरोधी आक्रोश दडपून टाकण्यासाठी सीएए, एनआरसी व एनपीआरसारखे संविधानविरोधी कायदे आणले आहेत. हे जोपर्यंत मागे घेतले जात नाहीत. तोपर्यंत लोकशाही पद्धतीने जनआंदोलन सुरु राहील. त्याअंतर्गत शुक्रवारी (दि.24) वंचित बहुजन आघाडी आणि राज्यातील शेकडो समविचारी संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे.

यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. या बंदची सांगता सायंकाळी 5 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जाहीर सभेने होईल, असे तायडे यांनी सांगितले.

महिला शहराध्यक्षा लता रोकडे, गुलाब पानपाटील, राष्ट्रीय इसाई महासंघाचे राजन नायर, ओबीसी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शरद म्हस्के, बौद्ध समाज विकास परिषदेचे शरद जाधव, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे डेव्हिड काळे, आझाद ग्रुपचे ताज्युद्दिन शेख, समाजवादी पार्टीचे रफिक कुरेशी, भीमशक्ती युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, झोपडपट्टी समस्या निवारण युवा संघटनेचे ईश्वर कांबळे, छावा स्वराज्य सेनेचे सौरभ सगर, आरटीई पालकसंघाचे अरुण मैगराळे, नंदीबैल समाज संघटनेचे बाबूराव फुलमाळी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.