Alandi News : आळंदी नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – आज (दि.13) आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi News) समोर रिपब्लिकन सेना, दलित पँथर ,वंचित बहुजन आघाडी,सिद्धार्थ ग्रुप व समस्त ग्रामस्थ आळंदी यांच्या माध्यमातून एकदिवसीय धरणे करण्यात येत आहे.

आळंदी येथे दि.13 मार्च रोजी आळंदी नगरपरिषदेच्या समोर रिपब्लिकन सेना, दलित पँथर ,वंचित बहुजन आघाडी, सिद्धार्थ ग्रुप व समस्त ग्रामस्थ आळंदी यांच्या माध्यमातून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन इनाम वर्ग 6 ब (महार वतन) सर्व्हे नंबर 1,2,3, क्षेत्रावर आळंदी नगरपरिषदेने अनाधिकृत केलेले अतिक्रमण ,आळंदीतील ग्रामीण रुग्णालया शेजारील भाजी मंडई स्थलांतरित करावी.

आळंदीतील स्मशानभूमी आणि विद्युत वाहिनी आरक्षित जागेवर त्वरित स्थलांतरित करावी,अन्यथा त्याचा मोबदला देण्यात यावा यासाठी करण्यात आले होते.तसेच यावेळी नगरपालिका प्रशासन,जमीन बळ कावू पाहणाऱ्या धनदांडक्यांच्या, राज्यकर्त्यांचा येथे निषेध व्यक्त करण्यात आला. आरक्षित जागेच्या ठिकाणी भाजी मंडई, स्मशानभूमी आणि विद्युत वहिनी व्हावी इ. असे यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले..

या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या पालिके मध्ये नव्याने रुजू झालो आहे. संबंधित पूर्ण माहिती घेतली जाईल. तहसीलदार यांना संबंधित विषयावर माहिती दिली जाईल.पालिके मध्ये एक दिवस सयुंक्तपणे सर्वांची बैठक घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकले जाईल. त्यावर योग्य तोडगा काढला जाईल.असे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी इनाम वर्ग 6 ब (महार वतन) सर्व्हे नंबर 1,2,3, क्षेत्रावर आळंदी नगरपरिषदेने अनाधिकृत केलेले अतिक्रमण व आळंदी ग्रामीण रुग्णालया शेजारी असणारी भाजी मंडई काढून टाकण्यात यावी यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

Maharashtra News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा;प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान

 

आळंदीतील ग्रामीण रुग्णालया शेजारील भाजी मंडई स्थलांतरित करावी, आळंदीतील स्मशानभूमी (Alandi News) आणि विद्युत वहिनी आरक्षित जागेवर त्वरित स्थलांतरित करावी,अन्यथा त्याचा मोबदला देण्यात यावा तसेच इनाम वर्ग 6 ब च्या जागा बळजबरीने विना मोबदला ताब्यात घेतल्या आहेत त्या रिकाम्या कराव्यात या प्रमुख मागण्या या आंदोलनात  करण्यात आल्या आहेत

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.