Pune : बीयू भंडारी समूहाकडून पोलिस वाहनांचे सॅनिटाइजेशन
एमपीसी न्यूज – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांची आरोग्याची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे बी यू भंडारी समूहाने पोलिसांच्या 300 पेक्षा जास्त वाहनांचे सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पोलिसांची गस्त घालण्याची वाहने व इतर वाहनांचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे.
याप्रसंगी वाहतूकचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, एससीपी मिलिंद पाटील, निरीक्षक धायगुडे, बावस्कर तसेच बी यू भंडारी ग्रुपच्या वतीने चंद्रवर्धन भंडारी, शैलेश भंडारी, देवेन भंडारी, राहुल बाल, सुभाष चुत्तर आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या गाडीचे सॅनिटायझेशन करण्यात आले. यावेळी उपस्थित चंद्रवर्धन भंडारी म्हणाले शहराची रक्षा करणाऱ्या पोलिसांची आपण काळजी घेतली पाहिजे.