Talegaon Dabhade: ‘लॉकडाऊन कट्टा’ अंतर्गत तळेगावात विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – यशवंत प्रतिष्ठान आणि नगरसेवक निखिल भगत यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन कालावधीत ‘लॉकडाऊन कट्टा’ हा आगळा-वेगळा उपक्रम 21 ते 30 एप्रिल या दरम्यान राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केले जातात. या उपक्रमाला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना विषाणूने देशभर थैमान घातल्याने केंद्र सरकारने 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिक घरात राहत आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी ’लॉकडाऊन कट्टा’ हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तळेगावातील विविध क्षेत्रातील तज्ञाची व्याख्याने, कोरोना संदर्भातील डॉक्टरांचे मार्गदर्शन, योगा, जीम, साहित्य वाचन, हास्यक्लब असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

हे सर्व उपक्रम विविक्ष क्षेत्रातील तज्ञ विनामुल्य करत आहेत. एका दिवसाला चार उपक्रमाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केले जातात. अशा प्रकारे दहा दिवसात 40 व्हिडीओ अपलोड करण्यात येणार आहेत. या उपक्रमाला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संविद पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.