Chakan : विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रक्त वाढीच्या गोळ्या मागण्याच्या बहाण्याने एकाने महिलेच्या घरात प्रवेश केला. महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केली. ही घटना 21 आणि 23 एप्रिल रोजी खेड तालुक्यातील स्वरमवाडी गडद येथे घडली.

संतोष विठ्ठल शिंदे (रा. स्वरमवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आला. ‘मला रक्त वाढीचा गोळ्या दे’ असे म्हणत त्याने घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन घरात प्रवेश केला. फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

त्यानंतर 23 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादी महिलेशी भांडण काढून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान आरोपीचे आई, वडील, भाऊ घटनास्थळी आले. त्यांनी आरोपीला बोल लावल्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.