Chinchwad : आळंदी, चाकण, हिंजवडीमधून तीन दुचाकी चोरीला
Three two-wheelers were stolen from Alandi, Chakan and Hinjawadi
एमपीसी न्यूज – आळंदी, चाकण आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 11) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विठ्ठल छबुराव गरुड (वय 51, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गरुड यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 14 / एएल 7191) 31 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. 1 ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
प्रेम शिवाजी जगताप (वय 23, रा. महात्मा फुले नगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 14 / जीएफ 0950) 8 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील मोकळ्या जागेतून दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. रात्री अकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला.
चाकण पोलीस तपास करीत आहेत.
सोपान दिनकर गोळे (वय 40, रा. गोळेवस्ती, मारुंजी गाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोळे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 14 / ईके 6032) 9 ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजता त्यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीत दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आला.
हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.