Pune News: पालिकेतील पार्किंग, फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करा – डॉ. नीलम गोऱ्हे
एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेतील पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
या बाबत आयोजित बैठकीस पुण्याचे वाहतूक अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, ठाण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे उपस्थित होते. त्यांनी गर्दीच्या वेळी येणाऱ्या वाहनांवर कारवाई आणि उपाययोजनासंदर्भात माहिती दिली.
ठाणे व पुणे येथे गर्दीच्यावेळी अवजड वाहनांच्या बंदीनंतरही वाहने रस्त्यावर येत आहेत. ठाणे येथील अवजड वाहनांसाठी प्रतिबंधित कालावधीत वाहने येऊ नयेत यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे डॉ. गो-हे यांनी सांगितले.