Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता
एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.
विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
पुढील हवामानाचा अंदाज :
28-31 ऑक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
01 नोव्हेंबर : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
इशारा :
28 ऑक्टोबर – 01 नोव्हेंबर : काही नाही