Kiwale News : सिम्बायोसिसच्या विद्यार्थिनी दुर्गा देवीच्या नऊ अवतारात
एमपीसी न्यूज – आदिशक्ती दुर्गादेवीचा उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त सिम्बायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी दुर्गा देवीचे नऊ अवतार धारण केले होते. या विद्यार्थिनींनी नऊ अवतारातील साडी परिधान करुन सरस्वती पूजेत सहभागी झाल्या होत्या.
दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने आज (दि.12) सिम्बायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे सरस्वती पूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बीएससी ब्युटी अँड वेलनेस प्रोग्रामच्या नऊ विद्यार्थिनिनी देवी दुर्गाच्या 9 अवतार धारण केले होते. यानिमित्ताने विद्यार्थिनिनी आपल्या मेकअपचे कौशल्य दाखविले. प्राध्यापिकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.