Bhosari News: सीताबाई कुलकर्णी यांचे निधन
एमपीसी न्यूज: भोसरी येथील ज्येष्ठ नागरिक सीताबाई रामराव कुलकर्णी (84) यांचे वृद्धापकाळाने आज (रविवारी) निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गोविंदराव कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. सीताबाई कुलकर्णी यांच्या पार्थिवावर भोसरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.