Hasan Mushrif : महाविकास आघाडीला पुन्हा धक्का; नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकारमधील पुन्हा एका (Hasan Mushrif) बड्या नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारवरील कारवाया काही थांबत नाहीयेत.

आज अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला आहे. त्यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर सकाळी 6 वाजल्यापासून हे छापे टाकण्यात आले आहेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या 100 कोटी घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही दिवसांआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

हसन मुश्रीफ यांच्यावर असलेले आरोप – Hasan Mushrif

1. गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याचा 100 कोटींचा घोटाळा

2. हा कारखाना मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्या ब्रिक्स इंडीया कंपनीला विकला गेला.

3. ही कंपनी बंगालमधील असून ती बंद आहे. या कारखान्याचे पैसे हे बंद कंपनीच्या बोगस खात्यावर ठेवण्यात आले आहेत.

4. हा कारखाना विकताना कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्य काम केले नाही.

कागल बंदची हाक – 

मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक झाले असून कागल येथील त्यांच्या निवासस्थानी जमा झाले आहेत. त्यांनी कागल बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच ही राजकारण भाजपने केले आहे. असे समर्थकांचे मत आहे.

Pimpri : कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रिया न केल्यामुळे वाढतोय धोका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.