Pimpri : कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रिया न केल्यामुळे वाढतोय धोका

एमपीसी न्यूज : महापालिकेतील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण (Pimpri) शस्त्रक्रिया प्रामाणिकपणे न पार पडल्यामुळे म्हणजेच गेल्या 10 वर्षात निर्बिजीकरणाच्या नावाखाली झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कशी वाढीस लागली व त्याचे दूरगामी परिणाम कसे होतात? ह्याचे प्रत्यक्ष दर्शन सध्या शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहेत. असे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ते म्हणतात की शहरात 2010 ते 2022 ह्या काळात कागदावरच भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले.12 वर्षात 3 कोटींपेक्षा जास्त रक्कम कुत्र्यांच्या निर्बिजीकरणं शस्त्रक्रियेसाठी खर्च केली गेली. गेली 12 वर्ष सातत्याने हा भ्रष्ट कारभार सुरू आहे. नागरिकही सुस्त आहेत. त्याचाच फायदा सत्तेचे वाटेकरी बिनबोभाट उचलत आहेत. कुत्र्यांच्या शस्रक्रियेच्या नावाखाली लाखो रुपयांचा मलिदा लाटत आहेत. लहान मुले व जेष्ठ नागरिक मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यानां बळी पडत आहेत. रेबीज इंजेक्शन व त्यांच्या उपचाराच्या खर्चापोटी दर वर्षी शहरातील शेकडो नागरिक 1.5. कोटी रुपये खर्च करीत आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांनी मात्र प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वतःचे स्थान बळकट केले आहे.

Sinhagad : सिंहगड रस्ता परिसरात महाविद्यालयीन तरुणीने कॅनॉलमध्ये मारली उडी

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या प्रमुख (Pimpri) पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये विजय मुनोत, विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, अंकुश माने, अर्चना घाळी, राजेश बाबर, सतीश मांडवे, अजय घाडी, तेजस सापरिया, सुकेश येरूनकर, सतिश देशमुख, लक्ष्मण इंगवले, राजेंद्र गावडे यांनी शहरात सलग 2 वर्षे पाहणीही केली. मात्र प्रशासन ढिम्मच. आज शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या.प्राधिकरणात दोन शालेय मुले व संत तुकाराम नगर मधील 6 वर्षीय मुलगा हा कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरे गेला. आपल्या शहरात वेळोवेळी अश्या घटनांनमध्ये वाढ होत आहे.

या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे  अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,”उद्यानांमध्ये लावलेली फुलझाडे दुसऱ्याच दिवशी ओलाव्याच्या शोधात कुत्री उखडून टाकत आहेत. त्यामुळे पालिकेच्या फुलझाडांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. सकाळच्या वेळी उद्यानात कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे लहान मुले आणि जेष्ठांस विशेष त्रासाला सामोरे जावे लागते. सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्चून फुलझाडे व इतर शोभीवंत रोपे उद्यानातील कर्मचारी दरोरोज व्यवस्थित रित्या लावत असल्याचे संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये दिसून आले परंतु दुसऱ्याच दिवशी कुत्र्यांनी तिथे मुक्काम केल्याचेही दिसून आले. अश्या पद्धतीने दरोरोज वाढत्या भटक्या कुत्र्यांची संख्या शहराच्या उद्यानांचे नुकसान तर करत आहेच सोबतच शहरवासीयांच्या जिवीतासही त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी कुत्र्यांची निर्बीजीकरण प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कशी होईल ह्याकडे आता तरी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.”

Pune : दुर्दैवी ! म्हशींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात, 8 म्हशींचा जागीच मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.