Pune : बलात्काराची केस मागे घेण्यासाठी महिलेच्या अंगावर टाकला ज्वलनशील पदार्थ
एमपीसी न्यूज : बलात्काराची केस मागे घेण्यासाठी एका (Pune) 38 वर्षीय महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भीम नगर परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पीडित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून रमजान खलील पटेल (वय 60) विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि पीडित महिला एकमेकांच्या ओळखीच्या आहेत. 2018 मध्ये आरोपीने फिर्यादीला फिरायला जाऊ असे सांगून बार्शी येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला होता. सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सध्या ही केस कोर्टात चालू आहे.
दरम्यान मागील आठ दिवसांपासून आरोपी फिर्यादी राहत (Pune) असलेल्या इमारतीत राहण्यासाठी आला. यावेळी त्याने बलात्काराची केस मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या मागे तगादा लावला. फिर्यादीला वाईट वाईट शिवीगाळ करून रॉकेल सारखा ज्वलनशील पदार्थ फिर्यादीचे अंगावर टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Talegaon : भर दिवसा दरोडा टाकणारी टोळी गजाआड; पाच आरोपी अटकेत