Pune News : मेट्रोच्या कामानिमित्त गणेशखिंड रस्त्यावर तात्पुरते वाहतूक बदल
एमपीसी न्यूज-मेट्रोच्या कामानिमित्त गणेशखिंड रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर तात्पुरते वाहतूक बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी (Pune News) दिली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातून (विद्यापीठ चौक) थोरात चौकाकडे (मॉडेल कॉलनी) जाणाऱ्या वाहनांसाठी सूर्यमुखी दत्तमंदिर चौकातून उजवीकडे वळण्यास (यू टर्न) तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे.
थोरात चौकाकडून वीर चाफेकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना सूर्यमुखी दत्तमंदिर चौकातून उजवीकडे वळण्यास तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे पोलिसांच्या (Pune News) वतीने करण्यात आले आहे.