Vishrantwadi : विश्रांतवाडीमध्ये टँकरची दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात जुळ्या चिमुकल्यांचा मृत्यू
आई-वडील दोघेही जखमी
एमपीसी न्यूज – पुण्यातील विश्रांतवाडी चौकाजवळ भरधाव वेगाने ( Vishrantwadi ) येणाऱ्या इंधनाच्या टँकरने दुचाकीला धडक दिली, यात जुळ्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांचे दोन्ही पालक गंभीर जखमी झाले. हा अपघात आज दुपारी 4.45 च्या सुमारास झाला.
Pune : रवी बापटले, प्रतिमा जोशी, राहुल रानडे यांना ‘धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा राहणारा हा माणूस त्याच्या 3.5 वर्षांच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह मोटारसायकलवरून आळंदीला चालला होता.
भरधाव वेगाने येणाऱ्या इंधनाच्या टँकरने दुचाकीला धडक दिली .यात जुळ्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत ( Vishrantwadi ) आहेत.