Pune : तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरू

एमपीसी न्यूज – तृतीयपंथींना राज्य शासनाच्या (Pune) विविध सेवा सुविधा बाबत माहिती देण्यासाठी व त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी समाज कल्याण विभागाने स्वतंत्र हेल्पलाइन कक्ष सुरू केला आहे.

पुण्यातील विश्रांतवाडी येथील स.नं. 104/105, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे हा कक्ष सुरू केला आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथींनी या कक्षाशी प्रत्यक्ष अथवा 020-29706611 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात आपत्ती निवारण कार्यशाळा संपन्न

काय मदत मिळेल –

तृतीयपंथींच्या समस्या व तक्रारीचे निवारण करणे, कल्याणकारी योजनांची माहिती देणे, महाविद्यालयांशी संपर्क साधून (Pune) तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतनयोजना, तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करणे व त्याबाबतच्या अडचणी सोडविणे, शिधापत्रिका, मतदान कार्ड व आधार कार्ड काढण्यासाठी मदत करणे, केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तृतीयपंथींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देणे, शासनाने व समाज कल्याण आयुक्तालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाबांबत माहिती देण्यासाठी यासाठी हा कक्ष मदत करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.