Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात आपत्ती निवारण कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयात ( Talegaon Dabhade) राष्ट्रीय सेवा योजना व वन्य जीव सुरक्षा मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती निवारण सप्ताहाचे औचित्य साधून आपत्ती निवारण कार्यशाळा घेण्यात आली. अचानक उद्भवलेल्या संकटांवर मात कशी कराल, बिकट प्रसंगांमध्ये तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्याबाबत या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी वन्य जीव रक्षक संस्था मावळचे अध्यक्ष व आपदा मित्र निलेश गराडे व त्यांचे सहकारी जिगर सोलंकी,सर्जेस पाटील, गणेश सोंडेकर यांनी सर्व स्वयंसेवकांना व्याख्यान व प्रात्यक्षिक मार्फत विशेष मार्गदर्शन केले.आपत्ती म्हणजे काय व त्यावर कसे उपचार करावेत याची सविस्तर माहिती त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना दिली. आपल्या स्वानुभवातून त्यांनी अचानक उद्भवलेल्या आपत्तीत कसे सामोरे जावे याबाबत यथोचित मार्गदर्शन या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले.

Worldcup 2023 : दुबळ्या अफगाणिस्तानचा गत विजेत्या इंग्लंडवर 69 धावांनी दणदणीत विजय

आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. कुठल्याही ( Talegaon Dabhade) बिकट प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची कार्यतत्परता तरुणांमध्ये असणे गरजेचे आहे असे डाॅ मलघे म्हणाले. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असते आणि हाच विधायक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात.

राष्ट्रीय सेवा योजने मार्फत राबविली जाणारी कार्यशाळा हा त्यातलाच एक भाग आहे असेही ते म्हणाले तसेच वन्य जीव रक्षक संस्था ही अतिशय मोलाची कामगिरी सामाजिक स्तरावर करीत आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे डाॅ मलघे म्हणाले.

या कार्यशाळेचा आम्हाला खूप फायदा झाला असून भविष्यात नक्कीच याचा फायदा समाज हितासाठी करू असे आश्वासन स्वयंसेवकांनी दिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डी पी काकडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डाॅ प्रमोद बोराडे यांनी केली तर आभार प्रा मिलिंद खांदवे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा दिप्ती पेठे,प्रा अर्चना काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.