Alandi : माऊली मंदिरात आदिशक्ती ‘संत मुक्ताईचे आनंदमय ज्ञानतेज’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : आदिशक्ती मुक्ताबाई यांची जयंती (दि. 15 ऑक्टोबर) व संत बहिणाबाई यांची पुण्यतिथी या (Alandi) निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान येथे ज्ञानदास डॉ. विजयकुमार फड (IAS, सचिव – वैधानिक विकास महामंडळ) लिखित ‘संत मुक्ताईचे आनंदमय ज्ञानतेज’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

ज्या संतांनी समाजातील अज्ञान व अंधकार दूर करून लोकांच्या कल्याणाकरिता आपला देह झिजविला त्यातील आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित ‘संत मुक्ताईचे आनंदमय ज्ञानतेज’ हा ग्रंथ आहे.

Pune : तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरू

याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री (Alandi) ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माऊली भक्त ॲड. दीपक कोल्हे (अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जालना), पोलीस निरीक्षक व नागरी हक्क संरक्षण पथक, पुणेचे घनश्याम बल्लाळ, अनिल वडगावकर, आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहन गायकवाड, ह. भ. प. भागवत महाराज साळुंखे, ह. भ. प. तांदळे महाराज, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.