Jejuri : पंढरपूरहून आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पिकपची धडक; एकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा(Jejuri)  आणि कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर येथून आळंदीकडे येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना भरधाव पिकपने धडक दिली. यामध्ये एका वारक-याचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जेजुरी जवळ दौंडज खिंडीत घडला.

कृष्णा नागोराव गरुड (वय 23, रा. मटकर आळा, ता. जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. सिधेशोर प्रभाकर बोबडे (वय 23, रा. बोबडे टाकली, ता. जि. परभणी), रितेश राजाराम ब्रम्हे (वय 18, रा. बोबडे टाकली, ता. जि. परभणी), चक्रधर कोपलवर (वय 28, रा. साडेगाव, ता. जि. परभणी) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Alandi : कार्तिक यात्रेसाठी अलंकापुरीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलिसांचा बंदोबस्त

पंढरपूर कार्तिकी वारी झाल्यानंतर आळंदी येथील कार्तिकी वारी आणि संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा आळंदीकडे मार्गस्थ झाला. ही दिंडी जेजुरी जवळ दौंडज घाटात आली असताना टँकरच्या नळाला काही वारकरी हात पाय धूत होते. त्यावेळी टँकरच्या मागून एक पिकप भरधाव वेगात आला. पिकपने टँकरच्या पाठीमागे असलेल्या वारकऱ्यांना धडक दिली.

त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिघांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात (Jejuri)  आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.