Pune : आई हे संस्काराचे, तर वडील संघर्षाचे विद्यापीठ – उल्हास पवार

एमपीसी न्यूज – आजच्या काळात कीर्तन सम्राट, राजकारणात राजकीय ( Pune)  सम्राट निर्माण झाले. आई हे संस्काराचे, तर वडील हे संघर्षाचे विद्यापीठ असल्याचे उर्वरित मंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती, बांधकाम व आरोग्य स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्ताने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना, तर जीवन गौरव पुरस्कार ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे (कीर्तनकेसरी) यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे,

सामाजिक कार्यकर्ते सचिन बराटे, माजी नगरसेवक विकासनाना दांगट पाटील,  माजी आमदार संभाजीराव कुंजीर, मुरलीधर निंबाळकर, बापूसाहेब पठारे उपस्थित होते. स्व. रामभाऊ बराटे मित्र परिवार, हॉटेल सुभद्रा कट्टातर्फे एस. एम. जोशी सभागृहात या कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शिंदे पगडी आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Jejuri : पंढरपूरहून आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पिकपची धडक; एकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

उल्हास पवार म्हणाले, आजच्या काळात प्रबोधन, प्रस्थाविकाची गरज आहे. आज काळ कमालीचा बदलला आहे. आजची नवीन पिढी चिंतन करणारी आहे. जिल्हा परिषदेत काम करणारी मंडळी आमदार, मंत्री झाले. स्व. रामभाऊ बराटे यांचे राजकारणात चांगले मित्र होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, रामभाऊ बराटे मित्र परिवार मैत्री जपणारा आहे. तो कोणत्याही पक्षात असो. 2012 नंतर पुणे जिल्हा परिषदेचा काळ बदलला गेला.

आज कोण कोणत्या पक्षात आहे, त्याचा विचार करा, उद्याचा नको. कोण कोणत्या पक्षात जातील ते सांगता येणार नाही.  रामभाऊ बराटे यांनी संप्रदाय जपला. उल्हास पवार हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. अनेकांना त्यांनी घडविले. त्यांचा जन्मदिवस कार्यक्रम  बालगंधर्वला साजरा करू. हल्लीच्या काळात राजकारणात कटुता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.

रणजित शिवतरे म्हणाले, तृतीय वर्षीही असा कार्यक्रम होणे महत्त्वाचे आहे. राजकारणात अर्थकारण महत्वाचे झाले आहे. कार्यकर्ता हा शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा असावा. आज वडील असते तर मी राजकारणात नसतो. कुटुंब मोठे होते, शेती महत्वाचे होते. कोरोना काळात चांगले काम केले.

चंद्रकांत महाराज वांजळे म्हणाले, रामभाऊ बराटे यांनी किल्लारी भूकंम्प झाल्यावर ग्रामपंचायतमध्ये ठराव करून 61 हजारांचा निधी दिला. रामभाऊ गेल्यावर मैत्री पोरकी झाली. कट्टा हा मातीचा नव्हे तर विचाराचा असतो. पुरस्काराने जबाबदारी वाढते.

जालिंदर कामठे यांनी प्रास्ताविक केले. मुरलीधर निंबाळकर यांनी आभार ( Pune) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.