पिंपरीत तडीपार गुन्हेगार हत्यारासह जेरबंद

एमपीसी न्यूज – तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून परिसरातील नागरिकांना कोयत्याचा  धाक दाखवून धमकाविणा-या एकाला पिंपरी पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई आज (गुरुवारी) मध्यरात्री मोरवाडी येथे करण्यात आली.

विश्वजीत रमेश जोशी (वय 28, रा. मोरवाडी झोपडपट्टी, पिंपरी), असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीत हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. गुरुवारी पिंपरी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी विश्वजीत हा तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून परिसरात आला आहे. रस्त्यावरून येणा-या -जाणा-या नागरिकांना हातामध्ये कोयता घेऊन धमकावित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.

पिंपरी ठाण्याचे फौजदार श्रीनिवास कामुनी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.