Maharashtra : यंदा दहावी-बारावीच्या परिक्षेत गैरप्रकारांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत घट

दहावीमध्ये 140 तर बरावीच्या परिक्षेत 306 गैरप्रकाराची नोंद

एमपीसी न्यूज – राज्य मंडळातर्फे ( Maharashtra) बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत घेण्यात आली. यामध्ये दहावीच्यापरिक्षेत 140 तर बारावीच्या परिक्षेत 306 गैरप्रकारांची नोंद करण्यात आली आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मात्र गैरप्रकारामध्ये घट झाली आहे.

Pune : पुण्यात ताड़ी तयार करण्यासाठी लागणाऱ्या केमिकलचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

बारावीच्या परीक्षेत राज्यभरात 306 गैरप्रकाराची नोंद झाली. त्यात सर्वाधिक 142 गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाअंतर्गत झाले. त्या खालोखाल पुणे आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 68 , लातूरमध्ये 26 , नाशिकमध्ये 23 , मुंबई आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी 11, कोकण विभागात 7 गैरप्रकार झाले. कोल्हापूरमध्ये एकही गैरप्रकार नोंदवला गेला नाही. गेल्यावर्षी 345 गैरप्रकारांची नोंद झाली होत

यंदा दहावीच्या परीक्षेत एकूण 140 गैरप्रकारांची नोंद झाली. सर्वाधिक 86 गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात नोंदवले गेले. त्या खालोखाल पुणे मंडळात 19 , नागपूर मंडळात 13 , लातूरमध्ये 10, नाशिकमध्ये सहा, अमरावतीमध्ये पाच, मुंबईमध्ये एका गैरप्रकाराची नोंद झाली. कोकण आणि कोल्हापूर मंडळात एकही गैरप्रकार नोंदवला गेला नाही. तर गेल्यावर्षी एकूण 116 गैरप्रकार प्रकरणांची नोंद झाली ( Maharashtra) होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.