Entelki Jeevan Disha : एंटेल्कीच्या ‘जीवन दिशा’ मधून जाणून घ्या आपल्या पाल्याचा शैक्षणिक कल अन घडवा उज्वल भविष्य

एमपीसी न्यूज – दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न प्रत्येक पाल्य ( Entelki Jeevan Disha)आणि पालकांच्या पुढे असतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आवड, छंद जोपासणे, नातेवाईकांच्या गावी जाणे, खेळणे यामध्येच अनेकांच्या सुट्ट्या संपून जातात. मात्र पुढे काय हा प्रश्न पुन्हा उभा राहतोच. त्यासाठी आपल्याला कोणत्या विषयात आवड आहे. कोणत्या क्षेत्रात आपण करिअर करू शकतो, हे माहिती असल्यास ‘आता पुढे काय’ असा प्रश्न पडत नाही. म्हणूनच ‘एंटेल्की’ आणि ‘एमपीसी न्यूज’ यांनी ‘जीवन दिशा’ ही परिपूर्ण करिअर व्यवस्थापन चाचणी आणली आहे.

आपल्या क्षमतांना गृहीत धरून शैक्षणिक वाटचाल करण्याची अनेकांना सवय असते. परंतु अशा सवईमुळे करिअर घडविण्यासाठी अनेक अडचणी येतात. शेवटी निराशा आणि पश्चाताप होतो. आपल्या पाल्याची कल चाचणी करणे अत्यावश्यक आहे. ही कल चाचणी केल्यास पाल्य आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनसोक्तपणे शिकेल आणि त्यातच आपले उज्वल भविष्य घडवेल. अलीकडच्या काळात शिक्षणाच्या आणि करिअरच्या शेकडो वाटा निर्माण झाल्या आहेत. त्यालाच अनुसरून ‘एंटेल्की’ने ‘संरक्षण मानसशास्त्र आणि कौशल्य चाचणी’ वर आधारित ‘जीवन दिशा’ ही कल चाचणी तयार केली आहे.

Pune : रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर रात्री दीडपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी

पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी वेळीच नियोजन करून नववी ते बारावीच्या ( Entelki Jeevan Disha) दरम्यान पाल्याची कल चाचणी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे पुढील शिक्षणास मदत होते. पण 12 वी पर्यंत देखील कल चाचणी केली नसल्यास महाविद्यालयीन जीवनात देखील कल चाचणी करण्याची सुविधा ‘एंटेल्की’ने आणली आहे.

करिअर बाबतची अवास्तव स्वप्ने, पालकांच्या अपेक्षा आणि समाजाचे दडपण याखाली विद्यार्थी हल्ली खूपच दबले आहेत. परंतु पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमतांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यांच्या अंगभूत क्षमता जाणून त्याबाबत योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

‘एंटेल्की’ आणि ‘एमपीसी न्यूज’ने पालक आणि पाल्य यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी ‘जीवन दिशा’ ही ऑनलाईन करिअर मार्गदर्शक चाचणी उपलब्ध केली आहे. ही चाचणी पाल्य घरबसल्या आपल्या डेस्कटॉप, लॅपटॉप, अथवा स्मार्ट फोनवरून ऑनलाईन माध्यमातून देऊ शकतात.

‘जीवन दिशा’मध्ये दोन प्रकारच्या चाचण्या आहेत. पहिली चाचणी नववी ते बारावी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरी चाचणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. या चाचण्या मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये IQ, EQ, LSQ (Life Skills Quotient), आणि OQ (Other Skills Quotient) अशा विविध पातळ्यांवर विद्यार्थ्यांचे विश्लेषण केले जाते.

चाचणी झाल्यानंतर तत्काळ पाच भांगामध्ये सविस्तर विश्लेषण अहवाल प्राप्त होतो. तो अहवाल सेव्ह करू शकतो, तसेच प्रिंटही काढू शकतो. विद्यार्थ्याची बलस्थाने आणि कमकुवतपणा लक्षात घेऊन त्यावर आधारित करिअरची क्षेत्रे सुचवली जातात.

कमकुवतपणाचे ताकदीमध्ये रुपांतर करण्यासाठी विस्तृत कृती योजनेची शिफारस केली जाते. त्या मदतीने विद्यार्थी आपले करिअर निवडू शकतात. आजवर ‘जीवन दिशा’ द्वारे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी कल चाचणी करून आपले करिअर बनवले आहे.

या कल चाचणीसाठी 1200 रुपये फी आहे. मात्र एमपीसी न्यूजने ही सेवा सवलतीच्या ( Entelki Jeevan Disha) दरात उपलब्ध करून दिली आहे. एमपीसी न्यूजच्या माध्यमातून 999 रुपयांमध्ये कल चाचणी करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –
मुकुंद भागवत – 7620609680
कर्नल प्रमोदन मराठे – 9823980987(व्हॉट्सअप कॉल)
ऋजुता भागवत – 9960975582

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.