Entelki Jeevan Disha : ‘जीवन दिशा’ परिपूर्ण करिअर व्यवस्थापन चाचणीबद्दल आज रात्री आठ वाजता ऑनलाईन चर्चासत्र

'एंटेल्की' आणि 'एमपीसी न्यूज' यांची 'जीवन दिशा' परिपूर्ण करिअर व्यवस्थापन चाचणी

एमपीसी न्यूज – ‘एंटेल्की’ आणि ‘एमपीसी न्यूज’ यांनी सुरु केलेल्या ‘जीवन दिशा’ या परिपूर्ण करिअर व्यवस्थापन चाचणीची 1 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. या चाचणीबाबत (Entelki Jeevan Disha) पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी बुधवारी (दि. 10) संध्याकाळी  8 वाजता ऑनलाईन चर्चासत्राचे (Entelki Jeevan Disha) आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून अनेकजण पुढील शैक्षणिक वर्षाबाबत विचार करत आहेत. कोणत्या शाखेत, कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, याबाबत अजूनही मनात संभ्रम सुरु आहे. आपल्या मुलाने / मुलीने अमुक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा. त्याने या पदावर काम करावे. त्याला चांगल्या पगाराची चांगली नोकरी मिळावी. त्याचे भविष्य उज्वल आणि समृद्ध व्हावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.

अनेकजण आपल्या पालकांच्या इच्छेखातर पालक सांगतील त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. पण मन मात्र रमत नाही. पाल्यांचे मन नेहमी त्यांच्या आवडीच्या क्षेत्राकडे ओढ घेत असते. त्यामुळे मुलांची आवड काय आहे, त्यांना कोणत्या क्षेत्रात रस आहे हे जाणून घेणे अतिशय गरजेचे असते.

म्हणूनच ‘एंटेल्की’ आणि ‘एमपीसी न्यूज’ यांनी ‘जीवन दिशा’ ही परिपूर्ण करिअर व्यवस्थापन चाचणी आणली आहे. इथे आपल्या पाल्याचा शैक्षणिक कल जाणून घेऊन पुढील दिशा ठरवण्यासाठी मदत होणार आहे. पालकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

https://meet.google.com/bsm-wxrk-uxp या लिंकवरून चर्चासत्रात सहभागी होता येईल. चाचणी कशी करावी तसेच  त्याची चाचणी अहवाल कसा असेल, याबाबत कर्नल प्रमोदन मराठे हे मार्गदर्शन करणार आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले जाणार आहे.

जीवन दिशा बद्दल महत्वाच्या गोष्टी –

प्रथम आपल्याला इथे (https://forms.gle/fUXtwzDDzqs4XRth9) दिलेला गुगल फॉर्म भरावा लागेल.

त्यानंतर चाचणीसाठी पेमेंट करा. (‘एंटेल्की’ आणि ‘एमपीसी न्यूज’ने अगदी माफक दरात ही चाचणी उपलब्ध करून दिली आहे. सर्व करांसहित अवघे ९९९ रुपये आपल्याला भरायचे आहेत).

फॉर्म सबमिट करून पेमेंट केल्यानंतर 24 तासात आपल्याला नोंदणीकृत मेलवर युजर आयडी (User ID), पासवर्ड (Password) आणि लिंक (Link) येईल.

आलेल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून पुढील तीन दिवसात आपल्याला ही चाचणी पूर्ण करायची आहे.

चाचणी पूर्ण होताच आपला पाच भागांमध्ये तपशीलवार अहवाल प्राप्त होईल. या अहवालात विद्यार्थ्याची बलस्थाने आणि कमकुवतपणा लक्षात घेऊन त्यावर आधारित करिअरची क्षेत्रे सूचवली जातात.

तुमच्या स्वप्नातल्या करिअरमध्ये जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी काही निश्चित गुण वैशिष्ट्ये ठराविक प्रमाणामध्ये अनिवार्य असतात. तुमच्या आजच्या गुणांमध्ये आणि त्या अनिवार्य अपेक्षित गुणांमध्ये तफावत असल्यास त्या करिअरची तुम्हाला  शिफारस केली जात नाही. परंतु यामध्ये काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

उलट, तफावत असलेल्या गुण वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करून अपेक्षित गुण पातळीपर्यंत पोहोचून अत्यंत आत्मविश्वासाने तुमच्या स्वप्नातील करिअर मिळविण्यासाठी हा जणू काही संकेतच आहे, असे मानून तुम्ही त्याच्याकडे पाहिले पाहिजे.

या अहवालात आपल्या स्वप्नातील करिअर दिसले नाही तर ‘माझे तफावत विश्लेषण’ (My Gap Analysis) या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील करिअर निवडण्याचा पर्याय दिला जाईल. त्यानंतर सिस्टीम तर्फे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील करिअरमध्ये जाण्यासाठी अनिवार्य असणारी गुणवैशिष्ट्ये, त्यांचे प्रमाण व तुमचा आजचा स्कोर यामधील तफावत सांगितली जाईल.

या नंतरची अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे ही तफावत भरून काढण्यासाठी तुम्हाला ‘सूचित सुधारणा’ अंतर्गत विशिष्ट कृती योजना दिली जाईल. आपल्यातील कमतरता दूर करण्याचा तुमचा निर्धार झाला आणि सूचित सुधारणांच्या रूपातील ‘एंटेल्की’चे मार्गदर्शन मिळाले तर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील करिअर साध्य करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क –
मुकुंद भागवत – 7620609680
कर्नल प्रमोदन मराठे – 9823980987(व्हॉट्सअप कॉल)
ऋजुता भागवत – 9960975582

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.