Pune : पुणे शहरातील गणेश विर्सजन मिरवणुकीचे लाइव्ह अपडेट्स
# पहाटे 6 वाजता शिवाजी, टिळक आणि बाजीराव रोडवर येथे डीजे चालू
# पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी लकडी पूल येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन
# पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी लकडी पूल येथे मंडईच्या महात्मा फुले गणपतीचे विसर्जन
# 3 वाजता भाऊ रंगारी गणपती अलका चौक येथे दाखल
# बाबू गेनू गणेश मंडळ अलका चौकात दाखल
# डीजे बंदी पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळांकडून दिवसभर सविनय कायदे भंग मात्र रात्री 12 ला सर्व बंद
# डीजे वाजवायला बंदी म्हणून ताटे वाजवली
# केळकर रस्त्यावर पोलिसांच्या समोर सगळे डीजे सुरू
# डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर पुण्यातील जवळपास सव्वाशे मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार
# डीजे लावणाऱ्या विसावा मारुती गणेश मंडळावर पोलिसांची कारवाई
# नरेंद्र मंडळाकडून लक्ष्मी रस्त्यावर फ्लेक्स लावून डी जे बंदीचा निषेध
# टिळक रस्त्यावर डिजे बंद करण्यावरून पोलीस आणि कार्यकर्ते भिडले