Pune: जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाला मारहाण ; दोघांना अटक
एमपीसी न्यूज : जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याची घटना काल सोमवारी (दि. 24) रात्री अडीचच्या सुमारास कोथरूड येथील दत्त मंदिरासमोर घडली.
संजय शंकर गोखले (वय 32 रा .गोसावी वस्ती, कोथरूड ) आणि राजू शंकर गोखले (वय 29 रा. गोसावी वस्ती, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी दत्ता गायकवाड (वय 30 रा.कोथरूड )यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता गायकवाड हे त्यांचा मित्र सतीश प्रभाकर हिरवे आणि पंकज कदम यांच्यासोबत रात्री दत्त मंदिरासमोर गप्पा मारत बसले होते. एका महिन्यापूर्वी फिर्यादी दत्ता गायकवाड आणि राजू गोखले यांच्यामध्ये वाद झाले होते. या भांडणांमध्ये दत्ता यांनी राजूला झापड मारली होती.