Nigdi : दिड हजार रुपयांची देशी विदेशी दारु जप्त

एमपीसी न्यूज – निगडी पोलिसांनी अवैध दारू विक्री करणा-या दोघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 1 हजार 664 रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) ट्रान्सपोर्ट नगर आणि सुभाष पांढरकर नगर आकुर्डी येथे केली.

कृष्णा नागराज शेट्टी (वय 20, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी), रायसाहेब रामबली जयस्वार (वय 45, रा. आकुर्डी)अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर मद्य विक्री केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे आरोपी कृष्णा हॉटेल स्वागत येथे बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 हजार 300 रुपये किमतीची देशी आणि विदेशी बेकायदेशीर दारू जप्त केली.

दुस-या एका कारवाईमध्ये सुभाष पांढरकर नगर येथे एक इसम बेकायदेशीररित्या टॅंगो पंच या दारूच्या बाटल्या खिशातून काढून देत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रायसाहेब याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून टॅंगो पंच देशी दारूच्या 364 रुपये किमतीच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या. दोघांवर मुंबई प्रोव्हिबिशन ऍक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.