Chinchwad : आदर्श आठवण; शहिद मेजर शशिधरन नायर यांचा चिंचवड मधील कन्येशी विवाह

मेंदू विकाराने त्रस्त असतानाही त्याने तिला स्वीकारले

एमपीसी न्यूज – होणा-या पत्नीला मेंदू विकार आहे. या आजारामुळे ती आयुष्यात कधी बरी होईल याची शाश्वती नाही. तरीही माणुसकीला जागून मनाच्या सोबतीसाठी त्याने तिच्याशी विवाह केला. एखाद्या चित्रपटाला साजेशी कहाणी शहीद मेजर शशिधरन नायर आणि त्यांची पत्नी तृप्ती यांची आहे. तृप्ती नायर या चिंचवड मधील आहेत.

तृप्ती पंडित शाळेत हुशार होत्या. थेरगाव पवार नगर येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्या मूळच्या तेलगू आहेत. त्यांचे संगणक अभियंत्याचे शिक्षण पिंपरी चिंचवड मध्ये पूर्ण केले. सगळं आनंदात आणि मनासारखं सुरु होतं. पण अचानक एक दिवस नियती फिरली आणि त्यांना एके दिवशी उभा राहता येईना. घरच्यांनी तात्काळ रुग्णालयात नेलं. तपासण्या वैगेरे झाल्या. त्यानंतर एक भयानक वास्तव समोर आलं, तृप्ती यांच्या मेंदू आणि कवटी यांच्या मधील संरक्षक पडदा पातळ झाला आहे. त्यामुळे त्यांना चालता येणं शक्य नाही. हा दुर्धर आजार दुर्मिळ आणि भयानक आहे.

दरम्यान, भारतीय लष्करात असलेले मेजर शशिधरन यांचे स्थळ त्यांच्यासाठी काढण्यात आले होते. त्यानंतर हा दुर्धर आजार समोर आला. पण त्याआधी दोघांनी सोनेरी आयुष्याची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली होती. आयुष्यभर सोबत देण्याचा आणाभाका एकमेकांना दिल्या होत्या. सुखदुःखात साथ देण्याची वचने एकमेकांना दिली होती. हा आजार त्यांच्या स्वप्नांच्या आड येणार नव्हता. त्यामुळे शशिधरन यांनी तृप्ती यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले.

शशिधरन नायर हे मल्याळी कुटुंबातील होते. त्यांचे संपूर्ण शिक्षक पुण्यात झाले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह ठरला. होणा-या पत्नीला दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यावेळी ते या स्थळाला नापसंती दर्शवू शकत होते. मात्र असे त्यांनी केले नाही. मनांची सोबत सुद्धा अन्य सोबतीपेक्षा अधिक महत्वाची असते. एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याची वचने एकमेकांना दिली होती. ती पाळण्याची संधी यानिमित्ताने त्यांना मिळाली होती. त्यामुळे शशिधरन यांनी लग्नाला होकार देत तृप्ती यांच्याशी विवाह केला. आकुर्डी येथील श्रीकृष्ण मंदिरात त्यांचा विवाह झाला. या विवाहामुळे समाजात एक आदर्श आणि सकारात्मक संदेश त्यांनी दिला.

पण नियतीने  पुन्हा डाव केला आणि जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्हयात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात नायर यांना वीरमरण आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.