Pune : पाण्याच्या शोधात हरीण पडले विहिरीत, बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
एमपीसी न्यूज- वाघोलीतील फुलमळा येथील शेतकरी कोंडीबा सातव यांच्या विहिरीत अंदाजे ३ वर्षे वयाचे हरीण (सांबर) पडले. आज पहाटेच्या सुमारास एक शेतकरी येथून जात असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. पाण्याच्या शोधात हे हरीण या विहिरीत पडले असण्याची शक्यता आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या हरणाला बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु त्यांना यामध्ये अपयश आले. त्यानंतर कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या टीमला बोलावण्यात आले. अंदाजे तीन वर्षे वय असलेल्या या हरणाला बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.