Chinchwad : चिंचवडमध्ये सव्वालाखांची घरफोडी
एमपीसी न्यूज- दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड येथील नलावडे वस्ती येथे ही घटना घडली असून शनिवारी (दि. 13) गुन्हा दाखल करण्यात आला.
नारायणलाल जेठाजी चौधरी (वय 65 रा.चिंचवड) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चिंचवड येथ नारायण सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. तेथे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आतील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्क असा एकूण 1 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.