Pimpri : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या शहराध्यक्षपदी संतोष धोका

एमपीसी न्यूज – जीतो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) पिंपरी चिंचवड संघटनेच्या नवीन कार्यकारणीचा शपथविधी कार्यक्रम पार पडला’. जीतो’च्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी संतोष धोका यांची निवड करण्यात आली.

या संघटनेचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी जीतो चे मुंबई संचालक विजय भंडारी, राजेश सांकला, महिला अध्यक्ष शर्मिला ओसवाल, कांतीलाल ओसवाल, अजीत सेठिया, इंद्रकुमार छाजेड, रमेश गांधी, विजय जीरावाला आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी जीतोच्या माध्यमातून राबविले जाणारे उपक्रम व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

  • शिक्षण, समाजकारण व धार्मिक कार्यात अग्रेसर राहून स्वतःचा व्यवसाय जगभर पोहचविण्यासाठी जीतो ही संघटना म्हणजे एक सुवर्ण संधी असल्याचे मत प्रसिध्द व्यावसायिक, महाराष्ट्र जीतोचे अध्यक्ष राजेश सांकला यांनी व्यक्त केले. चिंचवड-पिंपरी संघाच्या कार्यकारणीत महिला व युवकांचा सहभाग घेण्यात आला असून त्यांची कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली.

जीतो पिंपरी चिंचवड संघटनेची नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष- संतोष धोका,
उपाध्यक्ष- दिलीप सोनिगरा, नितीन बेदमुथा, प्रकाश गादिया, महेंद्र गंगवाल
सरचिटणीस- नेमीचंद ठोळे,
सचिव- मनीष ओसवाल, आंनद जैन
खजिनदार- पंकज सुराणा, नवनीतलाल बोरा, अमन जैन

  • महिला संघटनेत तृप्ती कर्नावट, अर्चना चोरडिया व युथ कार्यकारणीत दीपेश बाफना, रोनक जैन यांची निवड झाली. संघटनेच्या इतर विविध पदांवर राजेंद्र मुथा, तुषार लुणावत, शीतल खिवंसरा, आनंद मुथा, दिलीप नहार, प्रा.अशोक पगारिया, अशोक बागमार, पराग कुंकुलोळ, संकेत जैन यांची निवड करण्यात आली. ही कार्यकारणी दोन वर्षांसाठी कार्यरत राहणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.