Pune News : रविवारी जितोचा 17 वा वर्धापन दिन सोहळा

एमपीसी न्यूज- जैन इंटरनॅशनल ट्रेड ( Pune News) ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाचा 17वा वर्धापन दिन आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि.कार्यक्रम रविवारी (दि.12) सकाळी 10 वाजता अण्णा भाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यासाठी  मिलिंद फडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रकाश पारख, सामाजिक सेवेसाठी आर. के. लुंकड, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सुभाष परमार, व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वर्धमान जैन तसेच युवा उद्योजक अजय मेहता आणि सोनल बरमेचा यांचा गौरव मंत्री उदय सामंत आणि आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Today’s Horoscope 11 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

जितो अपॅक्स श्रमण आरोग्यमचे उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो अपॅक्सचे उपाध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जितो सल्लागार समितीचे विजयकांत कोठारी, अ‍ॅड. एस. के. जैन, संघटनेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, वर्धापन दिन सोहळा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विशाल शिंगवी, संयोजक विशाल राणावत, सहसंयोजक महेश ( Pune News)ओसवाल यांची उपस्थिती असणार आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.