Today’s Horoscope 11 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 11 March 2023- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

11.03.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय 22.01

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – चित्रा 07.11 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी- तूळ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

केवळ मोठेपणा घेण्यासाठी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे. वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. आज कमीच बोललेले बरे.

मिथुन ( शुभ रंग- लेमन )

दुकानदारांची उधारी वसूल होईल आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती जीवनास आनंद देतील.

कर्क (शुभ रंग- गुलाबी)

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील गृहिणी आज घर सजावटीवर भर देतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावेच लागणार आहेत.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी )

वास्तु व वाहन खरेदीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल मुले आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील. आज तुम्हाला एखादा वेगळा विषय शिकण्याची संधी मिळेल.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल आज काही दुरावलेली नाती जवळ येतील.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होईल. कठोर बोलण्याने काही तुमचे हितचिंतक दुखावण्याची शक्यता आहे कोणालाही मोफत सल्ले वाटप करू नका.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात मोठ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधा म्हणजे सापडेल.

धनु- (शुभ रंग- मरून)

कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज मना जोगती खरेदी ही करता येईल लांबच्या प्रवासात आज जागरुक असलेले बरे.

मकर ( शुभ रंग- आकाशी )

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेस यशस्वीपणे तोंड द्याल. भावनेच्या भरात कुणालाही शब्द देऊ नका. मित्रांच्या फार नादी लागू नका.

कुंभ (शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधावा.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांचे कितीही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज संध्याकाळी तुमची आपोआप सत्संगाकडे पावले वळतील.

शुभम भवतु 
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.