Lonavala : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांवर पावसाचा सुखद शिडकावा

एमपीसी न्यूज- उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज, रविवारी पावसाने काहीसा दिलासा दिला. लोणावळा शहर व ग्रामीण भागात दुपारी सव्वाचारच्या सुमारास उन्हाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातावरणातील ऊष्णता काही प्रमाणात कमी झाली.

थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या लोणावळा शहराचा पारा देखील यावर्षी सातत्याने 36 ते 40 अंशावर राहिल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. शनिवारी मावळाच्या काही भागात व पिंपरी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आज लोणावळा भागात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

त्यातच सकाळच्या दरम्यान काहीसे ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी मात्र कडक ऊन्हात अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना सुखद दिलासा मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.