Pimpri : महापालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ पिंपरी-चिंचवड महापालिकेत बुधवारी (१ मे ) उत्साहात पार पडला.
यावेळी ध्वजारोहण महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडगिरे आणि अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्यासह मान्यवर, कर्मचारी आदी उपस्थित होते.