Talegaon : जुना पुणे मुंबई महामार्गावर वडाचे झाड पडले; वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे मोठे वडाचे झाड जुना पुणे मुंबई महामार्गावर पडले. यामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 14) सायंकाळी घडली.

PCMC : पाणीपुरवठा सुरळीत करा; जनसंवाद सभेत मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील लिंब फाटा जवळ थंडामाला हॉटेल समोर असलेले मोठे वडाचे झाड महामार्गावर पडले. यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून रस्त्यावरील वडाचे झाड तातडीने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.