Pune : प्रसिद्ध गायिकेने केला राष्ट्रध्वजाचा अपमान; आयोजक आणि गायिकेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यात राष्ट्रध्वजाचा अपमान (Pune) केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्या 15 ऑगस्ट रोजी 76 वा स्वातंत्र्यदिन आहे. परंतु, काही नागरिकांना अजूनही राष्ट्रध्वजाचे महत्त्व कळाले नसून प्रसिद्धीसाठी अनेकजण स्टंट करताना दिसतात. अशातच पुण्यात एका गायिकेने स्टेजवर गाणे गात असताना राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचे निदर्शनास आले आहे.  

या प्रकरणी शांती पिपल म्युजिक बॅंडची मुख्य गायिका उमा शांती उर्फ JIAPHIA LARINA आणि कार्तिक मोरे (रा. औंध) यांच्या विरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस हवलदार तानाजी दादासाहेब देशमुख (वय 45 वर्षे) यांनी गुन्हा फिर्याद दिली आहे.

Talegaon : जुना पुणे मुंबई महामार्गावर वडाचे झाड पडले; वाहतूक ठप्प

सविस्तर माहिती अशी, की मुंढवा येथील कोरेगाव पार्क एनेक्स येथे हॉटेल (Pune) फ्रेकमध्ये आज दुपारी साडेबारा ते 1 वाजे दरम्यान आरोपी कार्तिक मोरे याने  PRE INDIPENDENCE DAY या कार्यक्रमाचे आयोज केले होते.

यावेळी कार्यक्रमात शांती या गायिकेने गाणे गाताना दोन्ही हातात राष्ट्रध्वज भिरकवला असून राष्ट्रध्वजाच्या आचारसंहिताचा भंग करत तो उपस्थित प्रेक्षकांमध्ये फेकून दिला.  तसेच हातावारे करून असभ्य वर्तन केल्याप्रकरणी आयोजक आणि गायिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.