Wakad : गुटखा विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारने रहाटणी येथे बुधवारी (दि. 6) केली.

Chinchwad : शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात कृष्णजन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा

नदीम शेख, समीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रवीण दळे यांनी वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रहाटणी मधील आदिनाथ कॉलनी येथे भाडेतत्त्वावर रूम घेतली. त्यामध्ये त्यांनी शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपींच्या खोलीवर छापा मारून कारवाई केली. यात पोलिसांनी 79 हजार 32 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.