Chinchwad : शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात कृष्णजन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – शिवतेजनगर (Chinchwad) येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात कृष्णजन्माष्टमी साजरी करण्यात आली. बुधवारी रात्री हभप व्यंकट महाराज बोळेगांवकर यांचे कीर्तनसंपन्न झाले. रात्री ठीक १२ वाजता श्रीकृष्ण जन्म झाला. महिला मंडळाकडून जन्माचा पाळणा म्हणण्यात आला.

Talegaon : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कंटेनर पलटला

बारा वाजता दहिहांडी फोडण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. या कार्यक्रमास प्रामुख्याने दिपक पाटील यांचे योगदान लाभले असून उत्सव प्रमुख म्हणून प्रा. हरिनारायण शेळके यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती दर्शविली. प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.