Chinchwad News: शिवतेजनगरमध्ये रंगली दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज – ‘ओंकार अनादी अनंत’, ‘विठ्ठल आवडी प्रेम भाव’, ‘येई ओ विठ्ठल’, ‘तु सप्त सुर माझे’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘उगवली शुक्राची चांदणी’, ‘सुन्या सुन्या मैफलित माझ्या’, ‘एरणीच्या देवा’, ‘कैवल्ल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या मधुर गाण्यांच्या मैफिलीने शिवतेजनगरमधील रसिक मंत्रमुग्ध झाले.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवतेजनगर चिंचवड येथे आज (बुधवारी) स्वर सुमनाचे आयोजन केले होते. सुगम संगीत, भक्ती संगीत, भावगीते आणि वादनाने ‘दिवाळी पहाट’ संस्मरणीय ठरली. सुश्राव्य गायनाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. मधुर गाण्यांच्या मैफिलीने शिवतेजनगरमधील रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी आयोजक, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ओंकार अनादी अनंत’, ‘विठ्ठल आवडी प्रेम भाव’, ‘येई ओ विठ्ठल’, ‘तु सप्त सुर माझे’ ही गाणी एन. धाबेकर यांनी गायली. ‘आली माझ्याघरी दिवाळी’, ‘वटवृक्ष तळी स्वामी’, ‘फुलले रे क्षण माझे’, ‘सुन्या सुन्या मैफलित माझ्या’, ‘एरणीच्या देवा’, ‘लक्षदिप हे’, ‘झिणी झीणी वाजे बीन’ भक्ती मुसळे यांनी ही गाणी गायली. ‘ओम नम: शिवाय, शंभो शंकरा’, ‘दहिदुध लोणी’, ‘मलमली तारुण्य माझे’ ही गाणी दिपाली धमाळ यांनी गायली. ‘हृदयाच्या तालावर’, ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ ही गाणी दिगंबर राणे यांनी गायली.

तर, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘उगवली शुक्राची चांदणी’ ही गाणी दिपाली धमाळ, भक्ती मुसळे यांनी गायली. ‘देहाची तिजोरी- देव देव्हा-यात नाही- निजरुप दाखवा हो – वेदानाही नाही कळला-अवघे गरजे पंढरपूर’, ‘कैवल्ल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या मधुर गाण्यांच्या मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध झाले.

अनुप कुमार यांनी बासरी, प्रसाद भांडवलकर यांनी ढोलकी तर सारंग भांडवलकर यांनी तबल्याची साद दिली. सुश्राव्य गायनाला परिसरातील रसिकांनी भरभरुन दाद दिली. नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

आयोजक, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे म्हणाले, ”स्वर सुमनाने शिवतेजनगरमध्ये दिवाळी पहाट रंगली. गाण्यांच्या मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत. दिवाळी पहाटचा आनंद घेतला”. प्रास्ताविक राजेंद्र घावटे यांनी केले. तर, सूत्रसंचालन भाऊसाहेब सोलट यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.