Chinchwad : शिवतेजनगर येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

एमपीसी न्यूज : शिवतेजनगर येथील शिवतेज प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, राजे शिवबा युवा मंच आदी सामाजिक संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले.

याप्रसंगी नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे आदी उपस्थित होते. मोरया ब्लड बँक तर्फे डॉक्टर कमलेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्ताचे संकलन केले. हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर अशा दोन ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठया प्रमाणात तुटवाडा निर्माण झाला आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात घ्यावीत, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

सोशल डिस्टन्सचे पालन करून स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळत हे शिबिर संपन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.