Dighi : सुरक्षारक्षक व व्यावसायिकामध्ये झटापट परस्पर विरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  हटकले म्हणून सुरक्षा रक्षक व एका व्यावसायिकामध्ये भांडण झाले. ज्याचे रुपांतर मारहाणीत झाले. हा सारा प्रकार चऱ्होलीतील प्राईड वर्ल्ड सिटीच्या गेटवर बुधवारी (दि.11) घडला. याप्रकरणी दिघी (Dighi) पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

Sangvi : सांगवीत सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरीला

याप्रकरणी मंगेश हयप्पा मटपती (वय 35 रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विनोद विठ्ठल पाथरुट (वय 26 रा. लोहगाव), जिवन विठ्ठल पाथरुट (वय 27), महिंद्र बाबुराव पवार (वय 30), आदित्य राजेश गुप्ता (वय 21), साहील मोहन मिसाळ (वय 23), अवनिश दिनेश उपाध्याय (वय 21) अशी टक आरोपींची नावे असून इतर 12 ते 14 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र हे जेवून परतत असताना त्यांना पाच ते सहा जण घोळका  करुन उभराल्याचे दिसले. यावेळी फिर्यादींना शंका आल्याने त्यांनी आरोपींना हाटकले. याचा राग येवून आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली.

यावेळी गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला हे कोण आहेत अशी फिर्यादी यांनी विचारले असता त्याने ही धक्काबुक्की केली. थोड्यावेळात दुचाकीवरून 15 ते 20 जण सेक्युरीटी गार्डच्या गणवेशात आले व त्यांनी फिर्यादीला लोखडी पाईप, बांबू काठ्या, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे असे सांगितले आहे.

तर या विरोधात विनोद विठ्ठल पाथरुट यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार स्वप्निल देवकर व मंगेश मटपती व त्य़ांचा आणखी एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, गेटवर बांडणे झाल्याचे समजताच फिर्यादी व त्यांचे साथीदार भांडणे सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी दांडक्याने, दगडाने व विटे मारून फिर्यादी व त्यांच्या भावाला जखमी केले. दिघी पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.