Sangvi : सांगवीत सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज-  जुनी सांगवी येथे एका फ्लॅटचे सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले ( Sangvi ) आहेत. ही घरफोडी मंगळवार (दि.10)ते बुधवार (दि.11)या कालावधीत घडली आहे.

Pimpri : लम्पीची भीती, पशुपालकांनी काळजी घ्यावी, पालिकेचे आवाहन

 याप्रकरणी किरण सचिन गवारे (वय 37 रा.जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट बंद असताना चोराने लोखंडी ग्रीलच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतील दरवाजाचे कुलूप तोडले व घरात प्रवेश करत घरातील 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
सांगवी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत ( Sangvi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.