Pimpri : लम्पीची भीती, पशुपालकांनी काळजी घ्यावी, पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – जनावरांना होणारा लम्पी हा आजार पुन्हा विषाणूजन्य चर्म रोगाचा प्रादुर्भाव होत ( Pimpri ) असून तो रोखण्याचे आव्हान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागापुढे निर्माण झाले आहे. अशा आजारांची तपासणी करुन लसीकरण करुन घ्यावे. हा विषाणुजन्य रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश पिंपरी पशु वैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिले आहेत.

Pune : डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

शहरात मोकाट फिरणारी व पाळीव जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जनावरांना लम्पी रोगाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. लम्पी आजार हा कॅप्रीपॉक्‍स विषाणूमुळे होतो.

त्यामुळे जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मि.मी. व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप येतो. डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव सुरु होतो.

चारा पाणी खाणे कमी अथवा बंद होते. दूध उत्पादन कमी होते. काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे, असे प्रकार घडतात.

लम्पी आजार संक्रमण होणारा रोग आहे. डास, चावणाऱ्या माश्‍या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषित चारा-पाणी यामुळे हा आजार जोरात फैलावतो.

त्यामुळे पशुपालकांनी चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत.

बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरस निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी घालावी.

रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करावी.

डांस, माश्‍या, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करावा, असे आवाहन उपायुक्त खोत यांनी ( Pimpri ) केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.