Lonavla News : मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दुधाचा टँकर उलटला

मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी 

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ आज सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उलटला. यामुळे मोठ्या प्रमाणात दुध रस्त्यावर सांडले गेले तसेच टँकर हा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने द्रुतगती मार्गावर आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने महामार्ग पोलीस, आयआरबी पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे पथक यांनी घटनास्थळाकडे जाऊन अपघातग्रस्त टँकर बाजुला करण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. यानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने तसेच उतारावर दुध सांडल्याने रस्ता निसरडा झाल्याने वाहतूक पुर्ववत होण्यास बराच वेळ लागणार असल्याने सांगण्यात आले आहे.

 

Photos by Sameer Patil

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.